Cabinet Expansion : मराठवाड्यात 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी, कोण आहेत ते तिघे?
गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. कोणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार? मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असताना अखेर आज नागपूरात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथ विधी पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. कोणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार? मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं असताना अखेर आज नागपूरात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथ विधी पार पडणार आहे. त्यासाठी नागपुरात मोठी तयारी झाली असून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण 39 आमदारांना फोन करण्यात आले आहेत. अशातच मराठवाड्यात सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाला असून या सहा आमदारांपैकी तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या चेहऱ्यांमध्ये संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. यासोबतच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि अतुल सावे देखील मंत्रिमंडळात असणार असल्याची माहिती मिळत आहे.