Cabinet Expansion : नवरात्रोत्सवात रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? कुणाला किती पदं मिळणार?
VIDEO | राज्यातील महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या नवरात्रोत्सवात मार्गी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेला पितृपक्षाचा कालावधी संपताच १५ किंवा १६ ऑक्टोबर रोजी राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपकडून देखील याबाबत दबाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोस्तवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला ६ ते ७ मंत्रिपदं मिळणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. यासोबतच उरलेली मंत्रिपदं शिंदे गट आणि अजित पवार गटाला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर महामंडळ वाटपाच्या निर्णयाची शक्यता असून कुणाला किती मंत्रिपदं मिळणार यासह कुणाची मंत्रिपदासंदर्भात वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आह.