Cabinet Expansion : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद येणार, शिवसेना आमदाराचा दावा

Cabinet Expansion : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद येणार, शिवसेना आमदाराचा दावा

| Updated on: Oct 11, 2023 | 5:10 PM

VIDEO | नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता असताना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पालकमंत्री होतील, असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. रायगडचा पालकमंत्री पद आणि रायगडचे मंत्री हे भरत गोगावलेच होणार'

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला ६ ते ७ मंत्रिपदं मिळणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. अशातच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पालकमंत्री होतील, असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. रायगडचा पालकमंत्री पद आणि रायगडचे मंत्री हे भरत गोगावलेच होणार. आमच्या सर्व आमदारांचा त्यांनाच पाठिंबा आहे आणि सध्या चर्चेत नाहीये त्यामुळे भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये मंत्रिमंडळाची माळ पडणार असल्याचा विश्वास शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आता १००% होणार असा सर्व शिवसेना आमदारांना विश्वास असल्याचे महेंद्र थोरवे म्हणाले.

Published on: Oct 11, 2023 05:10 PM