सस्पेन्स संपला, मराठा आरक्षणाबाबच्या मसुद्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी; कोणत्या क्षेत्रात मिळणार आरक्षण?
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. मराठा समाजास राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून मान्यता दिली जात आहे
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. मराठा समाजास राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून मान्यता दिली जात आहे. मराठा समाजाची लोकसंख्या २८ टक्के असून खासगी शैक्षणिक संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांना हा अध्यादेश लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकरी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू असणार आहे, मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजासाठी करण्यात आले आहे. या अहवालानुसार, मराठा समाजाचे हे आरक्षण राज्यापुरते मर्यादत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मिटिंग पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे.