संजय राऊत यांनी पोकळ गप्पा मारू नये, शिवसेनेतील मंत्र्याचा निशाणा, बघा काय म्हणाले?

संजय राऊत यांनी पोकळ गप्पा मारू नये, शिवसेनेतील मंत्र्याचा निशाणा, बघा काय म्हणाले?

| Updated on: Feb 25, 2023 | 3:58 PM

VIDEO | आमच्यातील हिंमत आम्ही सहा महिन्यापूर्वी दाखवली, शिवसेनेतील या मंत्र्याची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका

सातारा : सामना वृत्तपत्रातील चित्र काढायला हिंमत लागते. ती हिमंत एकनाथ शिंदे कुठून आणणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यावर शिंदेच्या शिवसेनेतील मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यातील हिंमत आम्ही सहा महिन्यापूर्वी राऊतांना दाखवली आणि ती महाराष्ट्राने पाहिली आहे. ज्या नेत्याच्या मागे 50 आमदार 13 खासदार असतात तो जिगरबाजाच असतो, म्हणूनच त्यांच्या पाठीशी आमदार खासदार असतात. संजय राऊत यांनी अशा पोकळ गप्पा मारु नये, त्यांच्या बेताल वक्तव्याकडे मी लक्ष देत नसल्याचे म्हणत संभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तर सहा महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांची हिंमत संपूर्ण देशाला दाखवून दिली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 25, 2023 03:58 PM