'8 ते 10 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार...', राज्याच्या मंत्रिमंडळावर कुणाचं भाष्य?

‘8 ते 10 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार…’, राज्याच्या मंत्रिमंडळावर कुणाचं भाष्य?

| Updated on: Jun 06, 2023 | 9:58 AM

VIDEO | मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी उशीर झाल्यास, कुणी केलं राज्याच्या मंत्रिमंडळावर भाष्य

नागपूर : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन बरेच महिने उलटले असले तरी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मुहूर्त अद्याप दिसत नाहीय. राजकीय वर्तुळात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणत्या मंत्र्यांची त्यात वर्णी लागणार याकडे साऱ्याचं लक्ष असून त्याची प्रतीक्षा लागली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेचे आमदार आशिष जैसवाल यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘सरकार धावायचे असेल तर २० मंत्री नाही, तर पूर्ण ४२ मंत्री गतीनं धावले पाहिजे. गतीमान सरकार आहे, त्यासाठी गतीमान मंत्री हवे. मंत्रिमंडळ विस्तार खूप दिवसांपासून प्रतिक्षेत आहे. सर्व कामात अडचणी येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा. एका एका माणसाकडे पाच सहा जिल्ह्याचे काम पाहणे अडचणीच आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार व्हायला हवा.’, असे त्यांनी म्हटले. तर ८ ते १० दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा, आधीच फार उशीर झाला. यापेक्षा जास्त उशीर योग्य नाही. सर्व आमदारांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने विस्ताराचा निर्णय घ्यावा. प्रत्येक आमदाराला क्षमतेनुसार, त्याच्या ज्येष्ठेतेप्रमाणे मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jun 06, 2023 09:52 AM