CAG Report | कॅगचे ताशेरे, आयुष्यमान भारतसह मोदी सरकारच्या 'या' 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा

CAG Report | कॅगचे ताशेरे, आयुष्यमान भारतसह मोदी सरकारच्या ‘या’ 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा

| Updated on: Aug 18, 2023 | 7:17 PM

VIDEO | केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड; भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२३ | मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगने हे ताशेरे ओढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. कॅगचा अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Aug 18, 2023 07:04 PM