कसबा विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, कुणी केली धक्कादायक मागणी?
VIDEO | विधानसभा पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आचारसंहिताही झाली लागू मात्र पोटनिवडणूक रद्द करण्याची कुणी केली मागणी?
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच मतदान उद्या होणार आहे. कसब्यातील जवळपास 270 बूथ वरती मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी कसब्यामध्ये आणि चिंचवड मध्ये दाखल झालेले आहेत. अशातच आज कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यानंतर भाजपचं शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अशातच आता कसबा विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, अशी धक्कादायक मागणी उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. बघा का केली बिचकुले यांनी अशी मोठी मागणी….