ठाकरे गटात प्रवेश अन् थेट उमेदवारी, डबल महाराष्ट्र केसरी लोकसभा लढणार, पहिली प्रतिक्रिया काय?
शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे, उमेदवारी जाहीर होताच चंद्रहार पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढणार, पहिली प्रतिक्रिया काय?
सांगली लोकसभेच्या जागे बाबत असणारा तिढा आता जवळपास सुटला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे, उमेदवारी जाहीर होताच चंद्रहार पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले, उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेसमध्ये नाराजी अद्याप संपलेली नाही,त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नाराजी संपणार का? असा सवाल उपस्थित होतोय. ‘महाविकास आघाडी असल्याने काँग्रेससह एकत्रित काम करणार आहे. माझी उमेदवारी घोषित होण्यापूर्वी मविआ जो उमेदवार देईल, ज्या पक्षांच्या उमेदवार देईल, त्याला पाठिंबा देऊन त्याला एकत्र मिळून विजयी करणार आहे. आमचा विजय नक्कीच खेचून आणू’, असेही चंद्रहार पाटलांनी म्हटले. चंद्रहार पाटील यांनी 11 मार्चला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी सांगलीची जागा शिवसेनाच जिंकणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला होता.