अजित पवार यांच्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळणार? प्रचाराचा रथ फिरला अन्…
बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार असल्याचे म्हटले जात आह. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभा लढणार आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार असून जित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देण्यात येणार?
पुणे, १६ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीचे वारे देशात सर्वत्र वाहू लागले आहेत तर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी उमेदवार ठरल्याने प्रचार सुरू झाला आहे. तर अशातच बारामती मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार असल्याचे म्हटले जात आह. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभा लढणार आहे. तर महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार असून जित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ लागला फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर मोठे फ्लॅक्स लावले आहे. त्यावर सुनेत्रा पवार यांच्या मोठ्या फोटोसह अजित पवार यांचा फोटोही पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकच चर्चा होताना दिसतेय.