'वंचित'ची लोकसभेची तिसरी यादी जाहीर, वसंत मोरेंना पुण्यातून तिकीट, आणखी कोणाची नावं?

‘वंचित’ची लोकसभेची तिसरी यादी जाहीर, वसंत मोरेंना पुण्यातून तिकीट, आणखी कोणाची नावं?

| Updated on: Apr 02, 2024 | 10:59 PM

वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत वसंत मोरे यांच्यासह कुणाला मिळालं लोकसभा निवडणुकीचं तिकीट?

वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलं आहे. वंचितच्या तिसऱ्या यादीत पुण्यातून वसंत मोरे यांच्यासह नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Published on: Apr 02, 2024 10:59 PM