लोकसभेच्या 9 जागांचा सामना ठरला, कोणात होणार सुपर 9 लढती, कुठे कोणते ठरले उमेदवार?
राज्यातील ९ लोकसभा लढतीतील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहेत. लोकसभेच्या सुपर 9 लढती...कुठे-कुठे उमेदवार ठरले? २०२४ चं गणित कसं असणार? २०१९ मध्ये कसा रंगला होता लोकसभेचा सामना?
राज्यातील ९ लोकसभा लढतींचे उमेदवार ठरलेत. आतापर्यंत ९ जागांचे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही आपले उमेदवार घोषित केलीये. राज्यातील ९ लोकसभा लढतीतील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहेत. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार यांच्यात सामना रंगणार आहे. सोलापूरातून राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे, भंडारा-गोंदियामध्ये सुनिल मेंढे विरुद्ध प्रशांत पेडोले, नागपूरमध्ये नितीन गडकरी विरूद्ध विकास ठाकरे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ विरूद्ध रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. तर गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते विरूद्ध नामदेव किरसान, नंदूरबारमधून हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी, नांदेडमधून प्रताप चिखलीकर विरूद्ध वसंत चव्हाण, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे विरूद्ध शिवाजीराव काळगे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…