फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवार यांना कुणी केलं आवाहन?
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे अजित पवार यांची बदनामी होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, असंही संजय राऊत यांनी म्हटले.
मुंबई, ३ मार्च २०२४ : शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध करण्यात येत आहे. ईडीने कोर्टाकडे हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. तर १५ मार्च रोजी याप्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे अजित पवार यांची बदनामी होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, असंही संजय राऊत यांनी म्हटले. शिखर बँक प्रकरणावरून संजय राऊतांनी ही टीका केली आहे. ‘सुनेत्रा पवार यांना माझं आवाहन आहे. त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे. तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली. खोटा गुन्हा दाखल केला. कुटुंबाची वनवण झाली. यादबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला’, असे राऊतांनी म्हटले.