कंगना रनौतविरोधात शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अभिनेत्री कंगना राणौत हिने शीख समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्याविरोधात लोक आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर अभिनेत्री कंगना राणौत विरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कंगना राणौत हिने शीख समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्याविरोधात लोक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी शीख समुदायानेही कंगनाच्या मुंबईतील खार येथील घरासमोर निदर्शने केली.
Latest Videos