रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

| Updated on: May 14, 2024 | 4:39 PM

राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा बाकी असतानाच महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यात नुकतंच १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. तर अजून राज्यात पाचवा टप्पा बाकी असतानाच महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर ही कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाणे येथे भाजपविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांचं वाटप भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. मात्र रवींद्र धंगेकर यांच्यावरच पुण्यात एक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: May 14, 2024 04:39 PM