छत्रपती संभाजीनगरच्या राडा प्रकरणी मोठी अपडेट, ३०० ते ४०० जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरच्या राडा प्रकरणी मोठी अपडेट, ३०० ते ४०० जणांवर गुन्हा

| Updated on: Mar 30, 2023 | 4:25 PM

VIDEO | छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा राडा प्रकरणी ३०० ते ४०० जणांवर दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यात मध्यरात्रीतून झालेल्या राड्याप्रकरणात तब्बल 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, किराडपुऱ्यातील हाणामारी, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी 300 ते 400 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यात झालेल्या राडा प्रकरणी शहरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. किराडपुऱ्यात ज्या भागात हा राडा झाला, तो परिसर शहरातील जिंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या प्रकरणात 300 ते 400 जणांवर दंगल घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Published on: Mar 30, 2023 04:25 PM