Pune : Yes Bank आणि DHFL घोटाळा प्रकरणी CBIची छापेमारी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगर परिसरातील कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय.
पुणे : येस बँक (Yes Bank) आणि डीएचएफएल (DHFL) घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून (CBI) पुण्यात छापेमारी करण्यात आलीय. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या शिवाजीनगर परिसरातील कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय. रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना अटक केल्यानंतर मुंबई आणि पुण्यात छापेमारी सुरु करण्यात आलीय.अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आलीय,या सर्वांचे मोठे राजकीय कनेक्शन असून सीबीआयच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Latest Videos