CBSC Result | सीबीएसई दहावीचा रत्नागिरीचा निकाल 97 टक्के, कुणी पटकावला पहिला नंबर?
VIDEO | रत्नागिरी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ७३१ विद्यार्थी परीक्षेकरता बसले किती झाले उत्तीर्ण?
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १२ वी बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल हा ८७.३३ टक्के लागला आहे. तर सीबीएसई इयत्ता दहावीचा निकालही शुक्रवारी जाहीर झाला. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १६ शाळेतून ३९३ विद्यार्थी तर ३३८ विद्यार्थिनी मिळून एकूण ७३१ विद्यार्थी परीक्षेकरता बसले होते. याविद्यार्थ्यांपैकी ७१६ विद्यार्थी पास झाले तर १५ विद्यार्थी काही कारणास्तव अनुत्तीर्ण झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवम बेंद्रे या विद्यार्थ्यांने ९८ टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर केवल खापरे याने ९७.२७ टक्के आणि अभिषेक पाटील याने ९७.०६ टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे.