New Delhi | सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) बुधवारी कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) बुधवारी कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचं पार्थिव गुरुवारी सांयकाळी दिल्लीला आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांनी काल दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.
Latest Videos