Army Helicopter Crash | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत जखमी, थेट LIVE UPDATE

Army Helicopter Crash | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत जखमी, थेट LIVE UPDATE

| Updated on: Dec 08, 2021 | 4:50 PM

सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर गेला आहे तर सीडीएस बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार असून त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे देशभरातील हलचाली आता वाढल्या आहेत. याप्रकरणात प्रत्येक क्षणी मोठी अपडेट समोर येत आहे.

माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, रावत यांची पत्नी मधुरीका रावतही होत्या. मात्र, यातील अनेक जणांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.