VIDEO : मारियोपोल, Volnovakha शहरात 5 तासांसाठी युद्धविराम
गेल्या दहा दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार उडाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे कीवसह युक्रेनमधील अनेक महत्वाच्या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. गोळ्यांचा वर्षाव आणि मिसाईल अटॅक्स यामुळे अनेक घरं आणि इमारतींची राखरांगोळी झाली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार उडाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे कीवसह युक्रेनमधील अनेक महत्वाच्या शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. गोळ्यांचा वर्षाव आणि मिसाईल अटॅक्स यामुळे अनेक घरं आणि इमारतींची राखरांगोळी झाली आहे. रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसल्याने लोक जीव मुठीत घेऊन लपून बसले आहेत. अनेकजण बंकर्समध्ये लपून बसले आहेत. तसेच परदेशातील अनेक विद्यार्थी आणि नागरिकही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनच्या सीमेवर या परदेशी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी सुखरूप परतता यावं म्हणून जगातील अनेक देशांनी रशियावर दबाव वाढवला होता. त्यामुळे रशियाने अखेर काही काळापुरता युद्धविराम जाहीर केला आहे.
Latest Videos