Kishori Pednekar | सण नक्की साजरा करा पण साजरा करत असताना गर्दी करु नका - किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | सण नक्की साजरा करा पण साजरा करत असताना गर्दी करु नका – किशोरी पेडणेकर

| Updated on: Sep 10, 2021 | 2:40 PM

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटी, राजकारणी मंडळी देखील गणरायाच्या भक्तीमध्ये दंगून गेलेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटी, राजकारणी मंडळी देखील गणरायाच्या भक्तीमध्ये दंगून गेलेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय. “कोरोना काळ सुरु असल्याने धुमधडाक्यात उत्सव साजरा करण्यावर मनाई आहे. शासनाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असं मुंबईकरांना मी आवाहन करते, असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना काळात शिवसेनेकडून अनेक ठिकाणी आरोग्यसेवा सेवा सुरु आहे, जनहिताचे प्रकल्प सुरु आहेत. हे सर्व निर्विघ्न व्यवस्थित पार पडू दे”, असं त्या म्हणाल्या.

मुंबईकरांनो कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

“मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगत आहेत की आपण सण नक्की साजरा करा पण तो साजरा करत असताना गर्दी करू नका उगाच एकमेकांच्या घरी जाणं करू नका. कारण आता दोन डोस घेतलेले पण थोडेफार बाधित होताना दिसत आहे. जिथे रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे तिथे तर काळजी घेतलीच पाहिजे. म्हणून मी म्हटलं ‘माझं घर, माझा बाप्पा’ साजरा करण्यावर लोकांनी भर द्यावा”, असंही त्या म्हणाल्या.