वसईत 108 वर्षाच्या यंग आजीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा, बघा व्हिडीओ

वसईत 108 वर्षाच्या यंग आजीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 09, 2023 | 6:54 PM

VIDEO | आजच्या समाजव्यवस्थेत आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व घेऊन जगणाऱ्या कुटुंबासमोर वसईतील 108 वर्षांचा आजीचा वाढदिवस हा एक आदर्श

वसई : नुकताच वसईत एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी एका बापाने आपल्या मुलाच्या प्रेमापोटी वाढदिवसानिमित्त चक्क hyundai verna या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केकच मागविला. आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस 221 किलोचा केक कापून मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. याची चर्चा थांबत नाही तर पुन्हा वसईत 108 वर्षाच्या आजीचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला गेला. वाढदिवसाला घरची सगळी मंडळी उपस्थित होती. वाढदिवसाच्या कुटुंबियांकडून लावलेल्या बॅनरमुळं वाढदिवसाची अधिक चर्चा झाली. वसईच्या खरभाट, संडोर पेरिश मधील रोजमेरी या आजीचा 108 वा वाढदिवस तिच्या सर्व कुटुंबाने साजरा केला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व घेऊन जगणाऱ्या कुटुंबासमोर वसईतील 108 वर्षांचा आजीचा वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित, विशेष म्हणजे वसईत सगळीकडे वाढदिवसाची चर्चा आहे.

Published on: Mar 09, 2023 06:54 PM