EC Press Conference on Assembly Election 2024 : पिपाणी वाजणारंच…निवडणूक आयोगाने शरद पवारांची ‘ती’ मागणी फेटाळली

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले. पिपाणी चिन्हावर बंदीची शरद पवार गटाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली. हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

EC Press Conference on Assembly Election 2024 : पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
| Updated on: Oct 15, 2024 | 5:51 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही माहिती दिली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे दिलीत. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधीने यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी केलेल्या मागणीनुसार, पिपाणी चिन्ह फ्रीज करणार आहात का? असा सवाल केला. यावर बोलताना निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची मागणी फेटाळल्याचे पाहायला मिळाले. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. यावेळी पिपाणी चिन्ह फ्रीज करणार आहात का ? तशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे, त्या प्रश्नावर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 2 मागण्या केल्या होत्या. त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठे करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. तसेच दुसरी मागणी त्यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची केली होती.ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. आयोगाने म्हटले की पिपाणी हे चिन्ह पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे त्याला आम्ही हात लावला नाही.

Follow us
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर, कशी असणार संपूर्ण प्रक्रिया?.
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.