Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी अन् सुखकर होणार, काय आहे मोठी बातमी?

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी अन् सुखकर होणार, काय आहे मोठी बातमी?

| Updated on: Nov 30, 2024 | 12:35 PM

. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना हे ३०० नव्या लोकलचं गिफ्ट देण्यात आलं आहे. तर जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्ससाठी ७ हजार ९२७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच...

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा लोकल प्रावस आता आरामदायी आणि सुखकर होणार आहे. कारण मुंबईकरांसाठी ३०० नव्या लोकल ट्रेनचं गिफ्ट देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना हे ३०० नव्या लोकलचं गिफ्ट देण्यात आलं आहे. तर जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्ससाठी ७ हजार ९२७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारण्यासह मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची, तसेच मध्य रेल्वे मार्गावरील परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकांवर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून पोस्ट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 30, 2024 12:35 PM