Free LPG Gas | 75 लाख गरिबांना मिळणार मोफत एलपीजी गॅस कनेक्शन?
VIDEO | मोदी सरकारकडून मोठी भेट, केंद्र सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर २०२३ | केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रूपयांची सवलत दिली होती. तर आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्गंत ४०० रुपयांची सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, मोदी सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं असून केंद्र सरकारने आता देशातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीवर १ हजार ६५० कोटी रूपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षात गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्गंत गरिब महिलांना मोठा लाभ मिळणार आहे.
Published on: Sep 13, 2023 11:28 PM
Latest Videos