Sanjay Raut | केंद्र सरकार शेतकरी प्रश्नांवर चर्चा करायला तयार नाही : संजय राऊत
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार बोलू देत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांसमोर ही गोष्ट मांडू. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आमच्याकडून दुर्लक्षित झालेला नाही. कृषी कायदा आणि पेगाससबाबत आमच्या घोषणा संसदेत होत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला तयार नाही. ते सध्या सर्वोच्च न्यायालय देखील खिशात असल्याच्या भूमिकेत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच पेगाससचा विषय गंभीर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल, तर आम्ही न्यायासाठी कोणत्या न्यायालयात जायचं, असा सवाल राऊत यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
आज आम्ही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज जाऊ. आज बैठक आहे. त्यात ठरेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार बोलू देत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांसमोर ही गोष्ट मांडू. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आमच्याकडून दुर्लक्षित झालेला नाही. कृषी कायदा आणि पेगाससबाबत आमच्या घोषणा संसदेत होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नोटिसा दिल्या. पण त्या फेटाळण्यात आल्या आहेत. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.