महाराष्ट्रात महायुती अन् मविआचं चित्र कसंय? काय सांगतो लोकसभा निवडणुकीवर TV9 चा ओपिनियन पोल?
महराष्ट्रात ४५ पार म्हणत स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मिशन ४५ + ची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकाही घोषित झाल्यात तर लोकसभा निवडणुकीवर TV9 चा ओपिनियन पोलनुसार महायुती ४५ चा आकडा पार करताना दिसत नाही
मुंबई, १७ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुका जिंकून मोदींना तिसऱ्यादा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कामाला लागलंय. तर राहुल गांधी यांनी पुन्हा न्याय यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही ९ ने ओपिनियन पोल घेतलाय. महराष्ट्रात ४५ पार म्हणत स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मिशन ४५ + ची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकाही घोषित झाल्यात तर लोकसभा निवडणुकीवर TV9 चा ओपिनियन पोलनुसार महायुती ४५ चा आकडा पार करताना दिसत नाही. महाराष्ट्रात एकूण महायुतीच्या २८ जागा, मविआ २० जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामध्ये भाजपला १७ जागा, शिवसेना आणि राष्ट्रवादी ११ आणि मविआला २०जागा मिळणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत भाजपला महाराष्ट्रात ६ जागांचं नुकसान होताना दिसतंय. कसं असणार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचं चित्र… ? लोकसभा निवडणुकीवर TV9 चा ओपिनियन पोल नेमका काय सांगतो… बघा स्पेशल रिपोर्ट