WITT Global Summit : ED कारवाया अन् ‘सरकारी यंत्रणांचा गैरवापर’ या आरोपांवर अमित शाह पहिल्यांदाच बोलले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकारणातील घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर मनमोकळ्या गप्पा मारल्यात. ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले....
नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०२४ : टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलन या विशेष सत्रात अनेक राजकारणातील दिग्गज नेते मंडळींनी आपला सहभाग दर्शविला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकारणातील घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर मनमोकळ्या गप्पा मारल्यात. ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला असता, अमित शाह यांनी ईडीच्या कारवाया या किती टक्के राजकीय नेत्यांवर केल्या जातात याचा हिशोबच मांडला. “आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून कोरोडो रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल. तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का. ईडीने जेवढ्या कारवाया केल्या. त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर ९५ टक्के इतर लोक आहे. पण अफवा पसरवली जात आहे. जे लोक भ्रष्टाचार करत आहेत, तेच लोक हा भ्रम फैलावत आहेत”, असे त्यांनी म्हटले.