रामदास आठवले यांनी सुचवला ओबीसी मराठा वादावर तोडगा
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देता येईल असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज असा कोणताही वाद घडवण्याचा सरकारचा प्रयत्न नाही. बिहार सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील प्रयत्न करायला हरकत नाही.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : रिपाई नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ओबीसी मराठा वादावर एक तोडगा सुचविला आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजासाठी एक वेगळी कॅटेगरी तयार करून आरक्षण देता येईल तसा विचार सरकारने करावा असे आठवले म्हणाले. राज्य सरकारने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देता येईल असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज असा कोणताही वाद घडवण्याचा सरकारचा प्रयत्न नाही असे त्यांनी सांगितले. महालक्ष्मी रेस कोर्स येथे धम्म सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या धम्म सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आणि एकंदर नियोजनाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. ज्याप्रमाणे बिहार सरकार 65 टक्केपर्यंत आरक्षण कोटा वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. तसा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने देखील करायला हरकत नाही असे ते म्हणाले.