Central Railway Big News : आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण …

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी नागरिकांची संख्या आणि त्या तुलनेने कमी असणाऱ्या लोकलची संख्या यातून ज्येष्ठांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. याकरता रेल्वेकडून काही पाऊलं उचलण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकल रेल्वेचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याची चाचपणी मध्य रेल्वेने सुरू केली आहे.

Central Railway Big News : आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
| Updated on: Sep 19, 2024 | 11:52 AM

मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही. अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत. येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे. रेल्वेतील एका मालडब्याचे जेष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या चार मालडबे आहेत. यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर धावत असलेल्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात जेष्ठ नागरिकांसाठी ७ आसने राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुविधा कमी असल्याचे दिसून येतेय.

 

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.