मुंबईकरांनो… लोकलने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच! मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक, पण कुठे?
सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर याचवेळी ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ ची रुंदी वाढविण्याचं काम केले जाणार आहे. शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक...
तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मध्य रेल्वेवर १ आणि २ जून रोजी ३६ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी वाढविण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर याचवेळी ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ आणि ७ ची रुंदी वाढविण्याचं काम केले जाणार आहे. शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळात एकूण ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचवेळी ७२ मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत. तर सीएसएमटीत ३६ तासांचा आणि ठाण्यात ६३ तास ब्लॉक आहे. स्थानकातील गर्दी आणि असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खासगी आस्थापनांना केले आहे.