कल्याण स्टेशनवर तुफान राडा, क्षुल्लक वादावरून महिला रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाला स्टम्पनं बेदम मारहाण
तिकीट काऊंटरवरील महिला कर्मचाऱ्याने एका महिला प्रवाशाला स्टम्पने बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून संबंधित प्रवासी महिला जखमी झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या क्षुल्लक मुद्यावरून झालेला वाद भयानक वळणावर...
मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे आणि गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर एक खळबळजनक घटना घडली. तिकीट काऊंटरवरील महिला कर्मचाऱ्याने एका महिला प्रवाशाला स्टम्पने बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून संबंधित प्रवासी महिला जखमी झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या क्षुल्लक मुद्यावरून झालेला वाद इतका भयानक वळणावर पोहोचेल याची कोणीही कल्पनाच नव्हती. यामध्ये संबंधित प्रवासी महिला जखमी झाली असून मारहाणाीमुळे तिला मोठा मानसिक धक्काही बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कल्याण स्टेशनवर हा प्रकार घडला. स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर जे तिकीट काऊंटर आहे, तेथे हा प्रकार घडला. पीडित महिला तिकीटाच्या लाईनीत उभी होती. सुट्ट्या पैशांच्या मुद्यावरून तिचे तिकीट काऊंटरच्या स्टाफशी भांडण झाले. बघता बघता त्याचा वांद वाढला, त्यावेळी त्या प्रवासी महिलेने स्टाफचा व्हि़डीओ काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती आणखीनच भडकली आणि तिने त्या महिलेला आत ऑफीसमध्ये बोलावले आणि तिला चक्क मारहाण केली.