Central Railway Update : मध्य रेल्वेने प्रवास करताय? मुंबईकरांनो… ऑफिसमधून घरी जाण्याआधी ही बातमी बघा, नाहीतर होणार खोळंबा
ऑफिसवरून घरी परतण्याच्या वेळातच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा धावत असल्याने अनेक रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ थांबली आहे. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल....
मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ऑफिसवरून घरी परतण्याच्या वेळातच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा धावत असल्याने अनेक रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ थांबली आहे. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ थांबल्याने अंबरनाथहून कर्जतकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे लेकल्स या रखडल्या आहेत. मध्य रेल्वेवर बिघाड हे आता प्रवाशांना रोजच असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आता संध्याकाळी सहा वाजता ऑफिसेस सुटण्याची वेळ असून रेल्वे प्रवाशी घरी परतण्याच्या वेळात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होताना दिसतेय.