शिर्डीतील साईबाबा मंदिरात केंद्रीय सुरक्षा लागू होणार?

शिर्डीतील साईबाबा मंदिरात केंद्रीय सुरक्षा लागू होणार?

| Updated on: Apr 23, 2023 | 6:28 AM

VIDEO | CISF सुरक्षेला नेमका विरोध का? शिर्डीतील साईमंदिरात केंद्रीय सुरक्षा लागू होण्याच्या निर्णयावर ग्रामस्थांनी केलं भीकमांगो आंदोलन

अहमदनगर : शिर्डीतील साईमंदिरात केंद्रीय सुरक्षा लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात काल शिर्डीतील काही गावक-यांनी न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यासाठी भिकमांगो आंदोलन केलंय. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईमंदिराला उडवून देणार अशाप्रकारे अनेकदा धमक्या आल्या होत्या. त्यामुळे शिर्डीतील साईमंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थान सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय मात्र शिर्डीतील नागरीक यास विरोध करताना दिसत आहेत. काल शिर्डीतील काही नागरीकांनी हनुमान मंदिराजवळ भिकमांगो आंदोलन करत या निर्णयाचा निषेध केलाय

Published on: Apr 23, 2023 06:21 AM