सत्तेची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत : Chadrakant Patil
केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती तर ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.