चेन खेचली अन् एक्स्प्रेस अर्धा तास रखडली, तेवढ्यात जमावाकडून तुफान दगडफेक, नेमकं काय घडलं?
अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रांग लागली होती. भुसावळहून नंदुरबारला जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी सुटली. रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले. काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली
जळगावच्या अमळनेर येथे चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबवली आणि तेवढ्यात काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची रांग लागली होती. भुसावळहून नंदुरबारला जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी सुटली. रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले. काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली. हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले आणि काही समाज कंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. दगडफेक होताच अनेक प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीत दगड येताच काही महिला आकांताने खिडकीत बसलेल्या प्रवाशांना खिडकी लावा म्हणून ओरडत होत्या. रेल्वे गार्डने रेल्वेतील बंदोबस्ताला असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना वारंवार साखळी ओढल्याच्या घटनेचे कळवले. मात्र दगडफेक झाल्याची माहिती नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी सांगितले.