पाच मिनिटाच्या अंतरावर चैत्यभूमी, आयुष्यात कधी गेलात?; आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

पाच मिनिटाच्या अंतरावर चैत्यभूमी, आयुष्यात कधी गेलात?; आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

| Updated on: May 02, 2022 | 3:54 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजाचं नाव घातलं का नाही? नाव घेतलं की नाही हे सर्व बालिश आरोप करणं बंद करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी गेला का चैत्यभूमीवर. पाच मिनिटाच्या अंतरावर चैत्यभूमी आहे. कधी तुमच्या हाताने हार घातला का बाबासाहेबांच्या फोटोला? असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलं.

Published on: May 02, 2022 03:54 PM