Assembly Election 2024 : …तर महाराष्ट्रात पुन्हा 2019 प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागणार? निकालानंतर सत्तेसाठी नेत्यांच्या हाती फक्त 48 तास अन्…
महाराष्ट्राचा निकाल काय असेल याकडे अवघा देश डोळे लावून बसला आहे. दुसरीकडे सर्व्हेमधील आकडे अटीतटीचा अंदाज वर्तवताय. अशातच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ४८ तासातच सरकार स्थापनेचे सोपस्कार पार पडण्याचे आव्हान आहेत.
उद्यावर आलेल्या निकालाची नेत्यांसह समर्थकांच्या मनातही धाकधूक वाढली आहे. मात्र नेत्यांनी धाकधूक केवळ निकालापूर्ती मर्यादित नसेल तर त्यानंतरचे ४८ तास धडकी भरवणारे असू शकतात. याचे कारण म्हणजे बहुमताचा आकडा जर अस्पष्ट आला तर सत्तेचा दावा आणि सरकारमध्ये स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे केवळ ४८ तासांचा अवधी आहे. अशातच महाराष्ट्राचा निकाल काय असेल याकडे अवघा देश डोळे लावून बसला आहे. दुसरीकडे सर्व्हेमधील आकडे अटीतटीचा अंदाज वर्तवताय. अशातच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ४८ तासातच सरकार स्थापनेचे सोपस्कार पार पडण्याचे आव्हान आहेत. नाहीतर पुन्हा २०१९ प्रमाणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीचं सरकार बनवलं तेव्हा गुवाहाटीचा दौरा देशभरात गाजला होता. मात्र यंदा तशी परिस्थिती येणार नाही, आणि जर तशी वेळ आली तर आम्ही गुवाहाटी ऐवजी दुसरा प्रदेश निवडू, असं मिश्किल विधान शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केलंय. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर पुढच्या ४८ तासातच बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान पक्षांपुढे असणार आहे. सत्तेची गणितं जर अपक्षांच्या हाती गेली तर पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.