Ajit Pawar UNCUT | महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता - अजित पवार

Ajit Pawar UNCUT | महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता – अजित पवार

| Updated on: Jul 29, 2021 | 2:20 PM

आताच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो केंद्राला पाठवला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तातडीने पूरग्रस्तांना मदत व्हायला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना कामं करण्याची मुभा दिली आहे. काही भागात आजही पाणी आहे, त्यामुळे तिथले पंचनामे बाकी आहेत. तिथले पाणी ओसरले की तातडीने पंचनामे केले जातील. अजूनही पावसाचा अंदाज सांगता येत नाही. अजुनही भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मदती संदर्भात निर्णय काल मंत्रीमंडळाने घेतला आहे. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून भूगर्भात काही बदल होतायत का?, याचा अभ्यास करण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाली. हे फक्त आपल्या राज्यात घडतंय असं नाही, उत्तराखंडला घडलंय. आताच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो केंद्राला पाठवला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.