“भागवत कराड, संदीपान भुमरे यांच्या सगळ्या कुंडल्या वेळेवर बाहेर काढणार”, ठाकरे गटाचा इशारा
ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि भाजपचे भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांनी, "चंद्रकांत खैरे हे वसुली बहाद्दर माणूस आहेत. त्यांनी किराणा दुकान सुद्धा लुटून काढले, एमआयडीसी सुद्धा धुवून काढली.
औरंगाबाद : ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि भाजपचे भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी संदीपान भुमरे यांनी, “चंद्रकांत खैरे हे वसुली बहाद्दर माणूस आहेत. त्यांनी किराणा दुकान सुद्धा लुटून काढले, एमआयडीसी सुद्धा धुवून काढली. टक्केवारी घेणे हाच त्यांचा व्यवसाय आहे”, असा आरोप केला होता. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिलीआहे. “संदीपान भुमरे यांच्या वडिलांची 4 एकर जमीन होती, आता भुमरे यांच्याकडे 700 एकर जमीन कुठून आली, 10 वाईन शॉप लायसन्स, पेट्रोल पंप, हॉटेल हे सगळं कुठून आलं? भागवत कराड, संदीपान भुमरे यांच्या सगळ्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, मी वेळेवर याबाबत बाहेर काढणार आहे. संदीपान भुमरे यांनी भ्रष्टाचार केलाय पैठणीची जनता माफ करणार नाही. त्यांची टक्केवारीची प्रकरणं 8 जुलैला बाहेर काढणार”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.