चंद्रकांत खैरेंचा पैसे वाटण्याच्या फोटोवरून खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप केला जातोय. भाजप नेते नितेश राणे आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी हा खळबळजनक आरोप केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप केला जातोय. भाजप नेते नितेश राणे आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. विशेष म्हणजे यावेळी फक्त शाब्दिक आरोप न करता त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार लोकांना पैसे वाटत असतानाचा फोटो शेअर केला आहे. शिवसेनेच्या विराट सभेचा फॉर्मुला असे कॅप्शन देत नितेश राणेंनी हा फोटो ट्विट केलाय तर मनसे नेते अमेय खोपकरांनीही थेट चंद्रकांत खैरेंचं नाव घेत हा फोटो शेअर केला आहे. यावरून आता चंद्रक्रांत खैरेंनी उत्तर दिलं आहे.
Published on: Jun 09, 2022 02:42 PM
Latest Videos