Chandrakant Khaire : ‘आता सगळं ओक्के…वाद कुठे होता?’, दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
“मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो. मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादास हा स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का?'', असं म्हणत खैरे काल दानवेंवर भडकल्याचे पाहायला मिळाले होते.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे गैरहजर राहिल्याचे दिसले. तर अंबादास दानवेंमुळे खैरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणं टाळलं असल्याची चर्चा होत होती. दरम्यान, अंबादास दानवेंकडून आमंत्रण मिळालं नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. इतकंच नाहीतर अंबादास दानवेंची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खैरे यांनी काल म्हटलं होतं. त्यानुसार चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आज दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काल अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात काहिसा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. यासंदर्भात माध्यमांकडून खैरेंना सवाल केला असता ते म्हणाले, ‘वाद कुठे होता? सगळं ओक्के झालं आता…’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे यांनी दिली.
जर वाद मिटला असेल तर तुम्ही आणि अंबादास दानवे यांनी एकत्र यायला हवे.. असंही माध्यमांच्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आलं असता, यावरही खैरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘शिवसेना भवनावर एक मिटींग आहे, मी चाललोय आता तिथे.. गळाभेट आम्ही कधीही घेत असतो.. तो लहान आहे माझ्यापेक्षा… यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम घेऊ’, असंही खैरे म्हणाले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
