Chandrakant Patil | चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

Chandrakant Patil | चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

| Updated on: Aug 18, 2021 | 11:09 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री चांदणी चौकातल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. चांदणी चौकातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे या रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनी चंद्रकांत पाटील रात्री दहानंतर या रस्त्याच्या कामाची पाहणी करायला आले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री चांदणी चौकातल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. चांदणी चौकातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे या रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनी चंद्रकांत पाटील रात्री दहानंतर या रस्त्याच्या कामाची पाहणी करायला आले होते. त्यावेळी रस्त्यावरचे खड्डे काही प्रमाणात बुजवल्याचे लक्षात आले. मात्र अजूनही हे काम पूर्ण व्हायचंय. 24 तारखेला चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहेत.