Chandrakant Patil : पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ... ही एक छोटी तडजोड

Chandrakant Patil : पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, … ही एक छोटी तडजोड

| Updated on: Oct 13, 2023 | 9:51 PM

VIDEO | पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणीही नाराज होण्याचे कारण नाही असे म्हणत काय दिल्या सूचना

पुणे, १३ ऑक्टोबर २०२३ | पालकमंत्रीपद गेल्यानं नाराज होऊ नका, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्रीपद गेलं ही मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. नाराज न होता लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. पालकमंत्री पद देणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे. बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी आहे. बारामती यावेळी जिंकली नाही तर पुन्हा कधीच संधी नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशा ‌सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. बघा काय म्हणाले चंद्रकातदादा…

Published on: Oct 13, 2023 09:51 PM