Chandrakant Patil | नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत, मविआकडून सत्तेचा दुरुपयोग

Chandrakant Patil | नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत, मविआकडून सत्तेचा दुरुपयोग

| Updated on: Dec 30, 2021 | 1:58 PM

नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबाबत बोलताना त्यांच्या पत्ता सांगायला मी काय मुर्ख आहे का ? अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे सांगितले होते. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. “राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर ते कमेंट करत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करत नव्हते. महाविकास आघाडी सरकार कृत्रिमरित्या आलेलं आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करुन घेतला तो नियमांना धरून नव्हता. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.