…तरीही भाजप गाफील राहणार नाही, पोटनिवडणुकाबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी दिली जात आहे का? याकडे साऱ्यांचे लक्ष असताना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले...
पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोणता उमेदवार असणार, यावरून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आज बैठक झाली.
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी दिली जात आहे का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर सांगितले. आजच्या बैठकीत कसबा पेठेतून शैलेश टिळक, हेमंत रासणे, गणेश बिडकर आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. पुणे शहर भाजपकडून पक्षश्रेष्ठीना पाठवली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर या निवडणुकीसाठी भाजप प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक चुरशीची करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची भाषा केली जात असली तरीही भाजप गाफील राहणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.