Chandrakant Patil | किरीट सोमय्या आतंकवादी आहेत का? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल
या नोटिशीनंतर भाजप नेते राज्य सरकारवर गंभीर टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या हे आतंकवादी आहेत का ? असा संतप्त सवाल केलाय.
मुंबई : उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. या नोटिशीअंतर्गत सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर भाजप नेते राज्य सरकारवर गंभीर टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या हे आतंकवादी आहेत का ? असा संतप्त सवाल केलाय.
Latest Videos