Chandrakant Patil | अमृता फडणवीसांचं नाव का घेता ? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या या आरोपांना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी कधी कुणाच्या बायकोवर आरोप केले का? हे रोज उठून आमच्या अमृता वहिनींवर आरोप करत आहेत. तरी त्यांनी किती संयम पाळायचा?, असं पाटील म्हणाले.

फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कधी कुणाच्या बायकोवर आरोप केले का? हे रोज उठून आमच्या अमृता वहिनींवर आरोप करत आहेत. तरी त्यांनी किती संयम पाळायचा? केवळ ते म्हणतात आणि माध्यमं छापून आणतात म्हणून त्यांनी काहीही म्हणू नये. मी विचारतो की, संजय राऊतांच्या पत्नीबद्दल कुणी काही बोललं? नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कुणी काही बोललं? पवार साहेबांच्या घराबद्दल कुणी बोललं? राजकारणात आपण आहोत, तर आपण एकमेकांवर बोलावं, दरवेळी तुम्हाला बोलण्यासाठी अमृता वहिनींचं नाव का लागतं? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मलिकांवर निशाणा साधलाय.