जेवताना राणेसाहेबांचं ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय :चंद्रकांत पाटील

जेवताना राणेसाहेबांचं ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय :चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 25, 2021 | 12:37 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नारायण राणे जेवत असताना त्यांच्या हातातील ताट हिसकावून घेणं, हे अमानवीय असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नारायण राणे जेवत असताना त्यांच्या हातातील ताट हिसकावून घेणं, हे अमानवीय असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर, नारायण राणे यांची शुगर वाढली होती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. नारायण राणे दोन दिवस आराम करतील त्यानंतर जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु होईल, असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद ही माहिती दिली. आम्ही अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही ड्राफ्टिंग केलं आहे. टीव्ही9ने दाखवलेली क्लिप सर्व जगाने पाहिली आहे. किती कायदा हातात घेणं चाललं आहे? किती अरेरावी चालली आहे? पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललं आहे. यांच्यात सरकार चालवण्याची हिंमत नाही. ती क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. हे कशात बसतं हे विचारणार आहोत, असं पाटील यांनी सांगितलं.